Explaination:
Indian National Centre for Ocean Information Services (INCOIS), Hyderabad, selected for Subhash Chandra Bose Aapda Prabandhan Puraskar-2025 in the Institutional Category, for its excellent work in Disaster Management. The award is announced every year on 23rd January, the birth anniversary of Netaji Subhash Chandra Bose. Indian National Centre for Ocean Information Services (INCOIS) was established in 1999, Hyderabad, Telangana. The INCOIS is integral to India’s disaster management strategy, specializing in early alerts for ocean-related hazards. It established the Indian Tsunami Early Warning Centre (ITEWC) which provides tsunami alerts within 10 minutes, serving India and 28 Indian Ocean countries. It has been recognized by UNESCO as a top Tsunami Service Provider.
आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी संस्थात्मक श्रेणीमध्ये भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS -इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस) या संस्थेची सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार- 2025 साठी निवड करण्यात आली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी दरवर्षी 23 जानेवारी रोजी हा पुरस्कार जाहीर केला जातो. भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राची स्थापना 1999 मध्ये तेलंगणामधल्या हैदराबाद येथे करण्यात आली. ही संस्था देशाच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणाचा अविभाज्य भाग असून महासागराशी संबंधित धोक्यांचे तातडीचे इशारे ती पुरवते. संस्थेने स्थापन केलेले भारतीय त्सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर (ITEWC) 10 मिनिटांत त्सुनामी इशारा प्रदान करते. हे केंद्र 28 हिंद महासागर देशांनाही सेवा देते. युनेस्कोने सर्वोच्च त्सुनामी सेवा प्रदाता म्हणून त्याची दखल घेतली आहे.